मुंबई:
दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा निकाल निरुत्साही राहिल्याचा परिणाम महिंद्रा लॉजिस्टीक्सवर बुधवारी शेअरबाजारात पाहायला मिळाला. महिंद्रा लॉजिस्टीक्सचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 6 टक्के इतका घसरत 347 रुपयांवर खाली आला होता. अशाप्रकारे समभागाने 52 आठवड्यानंतर नीचांकी स्तर बाजारात गाठला होता. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 16 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.









