मुंबई
तिसऱया तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे महिंद्रा फायनान्स कंपनीचा समभाग सोमवारी वधारताना दिसला. महिंद्रा फायनान्सच्या समभागाने दोन वर्षांनंतर उच्चांकी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीचा समभाग सोमवारी बीएसईवर इंट्राडे दरम्यान 10 टक्के वाढत 267 रुपयांवर पोहोचला होता. मार्च 2020 नंतर कंपनीच्या समभागाच्या भावाने इतकी मोठी झेप घेतली आहे. महिंद्राच्या वाहन विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचाही सकारात्मक परिणाम समभागाच्या भावावर दिसून आला.









