मुंबई :
महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शीयल सर्व्हिसेस लिमिटेड (महिंद्रा फायनान्स)चे समभाग सोमवारी शेअरबाजारात सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात घसरणीत असताना दिसले. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत नफ्यामध्ये अपेक्षीत कामगिरी न केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम समभागावर सोमवारी दिसला. समभाग 12 टक्के इतका घसरत 245 रुपयांवर खाली आला होता. शुक्रवारच्या सत्रात समभाग 277 रुपयांच्या भावावर बंद झाला होता.









