मुंबई
पादत्राणांच्या विश्वात नाव कमावलेल्या लिबर्टी शूजचा समभाग शेअर बाजारात बुधवारी 17 टक्के इतका वाढताना दिसला. कंपनीच्या समभागाचा भाव बुधवारी एनएसईवर 17 टक्के वाढत 226 रुपयांवर पोहचला आहे. चार वर्षानंतर समभागाने नवी उंची गाठली असल्याचे दिसले आहे. यापूर्वी 2018 मध्ये कंपनीच्या समभागाने 222 रुपयांचा स्तर गाठला होता.









