मुंबई
किर्लोस्कर ऑइलचा समभाग शेअरबाजारात सध्याला तेजीत असताना दिसतो आहे. कंपनीचा समभाग ब्लॉकडिलमुळे वाढला असल्याचे कारण सांगितले जात आहे. बाजारात कंपनीचा समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (एनएसई) 14 टक्के वाढत 371 रुपयांच्या उच्चांकावर कार्यरत होता. 825 कोटी रुपयांच्या व्यवहारात ब्लॉकडिल झाल्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला आहे.









