मुंबई
दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी कल्याण ज्वेलर्सचा समभाग शेअरबाजारात चांगलाच झळाळताना दिसला आहे. तिसऱया तिमाहीत कंपनीच्या महसुलात 13 टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला आहे. सोमवारी भारतीय शेअरबाजारात कंपनीचा समभाग 6 टक्के वधारत 127 रुपयांवर पोहचला होता. याआधी कंपनीच्या समभागाच्या भावाने 29 डिसेंबर 2022 रोजी 134 रुपयांचा उच्चांक गाठला होता.









