मुंबई
कल्याण ज्वेलर्सचा समभाग सलग दुसऱ्या दिवशी तेजीत पाहायला मिळतो आहे. कंपनीचा समभाग शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 12 टक्के वाढत 128 रुपयांवर पोहोचला आहे. या आधीच्या सत्रात समभाग 114 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 13,045 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

21 जून 2022 रोजी कंपनीच्या समभागाने 55.25 रुपयांवर नीचांकी स्तर गाठला होता. यावर्षी कल्याण ज्वेलर्स 52 नवी स्टोअर्स सुरू करणार असल्याची माहिती आहे.









