मुंबई :
दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी कल्याण ज्वेलर्सचा समभाग बुधवारी शेअरबाजारात तेजीत असताना दिसला आहे. सदरचा समभाग वाढण्यामागे दुसऱ्या तिमाहीत कंपनीने कमावलेला वाढीव नफा हे सांगितले जात आहे. कल्याण ज्वेलर्सचा समभाग बुधवारी बीएसईवर 3 टक्के वाढून 348 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 34,490 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कल्याण ज्वेलर्सचा नफा दुसऱ्या तिमाहीत 27 टक्के वाढीसह 134 कोटी रुपयांवर पोहचला आहे.









