मुंबई :
वेल्डेड स्टील पाइप्सच्या निर्मितीतील कंपनी जेटीएल इंडस्ट्रिज यांचा समभाग सोमवारी शेअरबाजारात 52 आठवड्यानंतर उच्चांकी भावावर कार्यरत असताना दिसला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या पहिल्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून जूनच्या तिमाहीत दुप्पटीसह 25.37 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला आहे. जेटीएलचा समभाग 2 टक्के वाढत शेअरबाजारात सोमवारी इंट्रा डे दरम्यान 388 रुपयांवर कार्यरत होता. जून तिमाहीत कंपनीने 38 टक्के वाढीसह 504 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.









