मुंबई
जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपनीचे समभाग शेअरबाजारात 12 टक्के वधारले आहेत. समभागाचा भाव बुधवारी बीएसईवर 12 टक्केसह 274 रुपयांवर पोहचला आहे. 6 मार्चला हा समभाग 243 भावावर खुला झाला होता. वर्षभरात हा समभाग 18 टक्के घसरणीत होता आणि 2023 मध्ये पाहता जवळपास 6 टक्के समभाग घसरणीत आहे. 7.18 लाख समभागांमध्ये व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. आधीच्या सत्रात कंपनीचे बाजार भांडवल 44,307 कोटी रुपयांनी वाढले आहे.









