मुंबई
दुसऱ्या तिमाहीचे निकाल लागणार असल्याच्या वातावरणात आयटी कंपन्यांचे समभाग शेअरबाजारात सध्याला चांगलेच तेजीत असताना दिसत आहेत. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीसोबत बुधवारी बाजारात कार्यरत होते. जून तिमाहीपेक्षा याखेपेला आयटी कंपन्यांचे निकाल उत्साहवर्धक असतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. बीएसईवर आयटी निर्देशांक 16 टक्के वर्षानुसार पाहता तेजीत असून 2023 मध्ये 700 अंकांनी वाढला आहे.









