मुंबई
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आयआरबी इन्फ्रा स्ट्रक्चर डेव्हलपर यांचा समभाग शेअर बाजारात मंगळवारी तेजीत होता. मंगळवारी 4 टक्के वाढत समभागाचा भाव 26 रुपयांवर पोहोचला होता. याआधीच्या म्हणजे सोमवारच्या सत्रामध्ये समभाग 25.88 या भावावर बंद झाला होता. मार्चमध्ये टोल वसुलीमध्ये चांगली कामगिरी नोंदवली असल्याच्या पार्श्वभूमीवर समभाग बाजारामध्ये तेजीत असताना दिसला. मार्चमध्ये 369 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून कंपनीने जमा केल्याचे सांगितले जात आहे.









