मुंबई
प्रवर्तकांनी 800 कोटी निधीचे संकलन केल्याने आयनॉक्स विंड या कंपनीचे समभाग सोमवारी दमदार तेजी दाखविताना दिसले. सोमवारी बीएसईवर कंपनीचे समभाग इंट्रा डे दरम्यान 14 टक्के वाढत 328 रुपयांवर पोहोचले होते. हा कंपनीचा समभागाचा भाव 7 वर्षानंतर उच्चांकी स्थरावर पोहोचला आहे. आयनॉक्सच्या प्रवर्तकांनी 800 कोटी रुपयांची भर घालण्याचे आश्वासन दिल्याने याचा परिणाम समभागांवर दिसला.









