मुंबई :
इंडसइंड बँकेचे समभाग बुधवारी शेअरबाजारात 4 टक्के इतके वधारलेले पाहायला मिळाले. बँकेचा तिमाहीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात 30 टक्के वाढ नोंदवली आहे. याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या समभागावर होऊन समभाग 3.81 टक्के इतका बीएसईवर इंट्रा डे दरम्यान वाढत 1443 रुपयांवर पोहचला होता. सदरचा समभाग अशा रितीने 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला होता. 2124 कोटी रुपयांचा नफा बँकेने जूनच्या तिमाहीत प्राप्त केला.









