मुंबई
खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेचा समभाग गेल्या सहा सत्रामध्ये वधारताना दिसला आहे. मंगळवारी बीएसईवर बँकेचा समभाग इंट्रा डे दरम्यान 2 टक्के वाढत 1702 रुपयांवर पोहोचला होता. सलग सहाव्या सत्रामध्ये बँकेचा समभाग एकंदर 7 टक्के इतका वाढला आहे. एप्रिल 2022 नंतर समभाग उच्चांकावरती कार्यरत आहे. 18 ऑक्टोबर 2021 रोजी 1724 हा सर्वोच्च भाव बँकेने नोंदला होता.









