मुंबई
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचडीएफसी बँकेचा समभाग गेल्या दोन दिवसांपासून तेजीत दिसून आला आहे. एचडीएफसी बँकेचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1.5 टक्के वाढत 1632 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये बँकेचा समभाग 3 टक्के इतका वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत एचडीएफसी बँकेचा समभाग 13 टक्के तर एचडीएफसीचा समभाग 15 टक्के इतका तेजीत दिसून आला आहे.









