मुंबई
एचडीएफसी एएमसीचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात तेजीत असताना दिसला आहे. सदरचा कंपनीचा समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 8.93 टक्के इतका वाढत 2060 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात कंपनीचा समभाग 1891 रुपयांवर बंद झाला होता. इंग्लंडमधील गुंतवणूकदार अब्रड इन्वेस्टमेंट कंपनीतील 10 टक्के समभागांची 4126 कोटी रुपयांना विक्री करणार असल्याचे समजते. परिणामी समभागात वाढ झाली होती.








