मुंबई
एचसीएल टेक्नॉलॉजिसचा समभाग शेअरबाजारात शुक्रवारी 3 टक्के इतका वाढताना दिसला. कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ झाल्या कारणाने सदरचा समभाग वधारल्याची माहिती आहे. शुक्रवारी बीएसईवर इंट्राडे दरम्यान एचसीएलचा समभाग 3 टक्के वाढत 1073 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत 3983 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीच्या महसूलातही 17 टक्के वाढ झाली असून 26606 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात कंपनीला यश आले आहे.









