मुंबई :
गोकालदास एक्स्पोर्टस्च्या समभागाला मंगळवारी शेअरबाजारात अप्पर सर्किट लागले आहे. कंपनीचा समभाग मंगळवारी एनएसईवर इंट्रा डे दरम्यान 20 टक्के इतका वाढत 735 रुपयांवर पोहचला होता. अपॅरल निर्मिती कंपनी अट्रॅको ग्रुपचे अधिग्रहण करण्याच्या करारासंदर्भात गोकालदासची बोलणी सुरु झाली असल्याचे समजते. अट्रॅकोने अमेरिका आणि युरोपमध्ये आपल्या व्यवसायाचा जम बसवला आहे. याचाच सकारात्मक परिणाम समभागावर मंगळवारी पाहायला मिळाला.









