मुंबई
ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळाल्याप्रित्यर्थ जीई पॉवर इंडिया कंपनीचा समभाग शेअरबाजारात चांगलाच तेजीत असताना दिसला. बुधवारी कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान जवळपास 8 टक्के वाढत 182 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात हा समभाग 169 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचे बाजार भांडवल 1200 कोटींनी वाढले असल्याचे समजते. वेदांता कंपनीकडून जीई कंपनीला नवी ऑर्डर प्राप्त झाली आहे.









