मुंबई
गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) यांचा समभाग शेअर बाजारामध्ये गुरुवारी दमदारपणे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. सदरचा समभाग 76 टक्के प्रिमीयमसह 298 रुपयांवर सूचिबद्ध झाला होता. या समभागाची इश्यू किंमत 169 रुपये प्रति समभाग अशी होती. वंगणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या या कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना जवळपास 104 टक्के परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांकडून सुरुवातीपासूनच समभागाला चांगला प्रतिसाद मिळाला.









