मुंबई
चौथ्या तिमाहीतील नफ्यातील दमदार कामगिरीमुळे आयशर मोटर्सचा समभाग बाजारात शुक्रवारी वधारत व्यवहार करत होता. बाजारात घसरणीचा कल असताना आयशरचा समभाग 7 टक्के वधारत 3647 रुपयांवर पोहोचला होता. रॉयल एनफिल्डची ही सहकारी कंपनी असून चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 48 टक्के वाढीसह 906 कोटी रुपयांवर पोहोचला होता. या आधीच्या वर्षात याच अवधीत तो 610 कोटी रुपये इतका होता. तर 3804 कोटी रुपयांचा महसूल मागच्या तिमाहीत कंपनीने प्राप्त केला आहे.









