मुंबई :
मिष्टान्न फूडस या कंपनीचे समभाग बुधवारी शेअरबाजारात चांगलेच वधारलेले दिसले. सदरचे कंपनीचे समभाग बुधवारी बाजारात 9 टक्के इतके उसळत 14 रुपयांवर पोहचले होते. 52 आठवड्यानंतर सदरचे समभाग उच्चांकावर असून कंपनीने पहिल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 68 कोटी रुपयांचा नफा जूनच्या तिमाहीत कंपनीने कमावला असून तो 525 टक्के अधिक आहे. दोन दिवसात समभाग 30 टक्के इतका वाढला आहे.









