मुंबई
ऑनलाइन गेमिंग तसेच कॅसिनो विश्वात असणाऱ्या डेल्टा कॉर्प लिमिटेडचासमभाग बुधवारी शेअरबाजारात तेजी राखताना दिसून आला. सदरचा समभाग बुधवारी 2.93 टक्के इतका वधारत 194 रुपयांवर पोहचला होता. समभाग वधारण्याचे कारण कंपनीने जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 19 टक्के नफ्यात वाढ नोंदवल्याचे सांगितले जात आहे. 30 जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 67 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.









