मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग बुधवारी जवळपास 2 टक्के इतके घसरणीत असताना दिसले. जागतिक मंदी आणि व्याजदर वाढीच्या भीतीमुळे बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले असल्याचे कारण तज्ञांनी दिले आहे. रिअल इस्टेट निर्देशांक बुधवारी 1.9 टक्के घसरणीत होता, ज्यात गोदरेज प्रॉपर्टीज, डीएलएफ आणि महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स यांचे समभाग 3 टक्के इतके घसरणीत होते. तर मॅक्रोटेक, शोभा, ओबेराय, इंडियाबुल्स व प्रेस्टीज इस्टेट यांचेही समभाग 2 टक्क्यापर्यंत घसरलेले होते.









