मुंबई
सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग शुक्रवारी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी तेजीत असल्याचे पाहायला मिळाले. यात अल्ट्राटेक, दालमिया यांचा प्रामुख्याने समावेश होता. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान सिमेंट कंपन्यांचे समभाग जवळपास 4 टक्के इतके वाढलेले दिसले. अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट, स्टार सिमेंट, दालमिया भारत, इंडिया सिमेंट, जेके सिमेंट, श्री सिमेंट, रॅमको सिमेंट आणि हिडलबर्ग सिमेंट इंडिया यांचे समभाग शेअरबाजारात वधारलेले होते.









