मुंबई
अदानी समूहातील कंपनी अदानी ग्रीन एनर्जी यांचा समभाग शुक्रवारी 4 टक्के इतका वधारताना दिसला आहे. गेले 12 दिवस हा समभाग घसरणीत राहिला होता. अखेर शुक्रवारी समभाग वधारल्याने गुंतवणूकदार समाधानी दिसले आहेत. पुर्नवित्त योजना आखण्याची तयारी कंपनीची असल्याचे रॉयटरने म्हटले असल्याने याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला आहे. समभाग शुक्रवारी 3.63 टक्के वाढत बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 638 रुपयांवर पोहचला होता.









