नवी दिल्ली
एचडीएफसी आणि एचडीएफसी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांचे 63,870 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी व्यवहारादरम्यान मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात एचडीएफसी बँकेचा शेअर 6 टक्क्यांनी घसरला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी या शेअरची जोरदार विक्री होत आहे.









