मुंबई
:भारतीय दूरसंचार क्षेत्रात कार्यरत कंपनी भारती एअरटेलचा समभाग गेल्या दोन दिवसात 3 टक्के इतका घसरणीत राहिला आहे. सदरचा कंपनीच्या समभागाचा भाव 6 महिन्यांच्या नीचांकी स्तराच्या जवळपास आला असल्याचे सांगितले जाते. बीएसईवर बुधवारी इंट्रा डे दरम्यान कंपनीच्या समभागाचा भाव 1 टक्का घसरत 738 ऊपयांवर आला होता. 2 मार्च 2023 रोजी समभागाचा भाव 736 इतका होता.









