मुंबई
भारत फोर्ज कंपनीचा समभाग बुधवारी बीएसईवर जवळपास 7 टक्के घसरत 811 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. डिसेंबरच्या तिमाहीतील नकारात्मक निकालाचा परिणाम शेअरबाजारात समभागावर झाल्याचे दिसून आले. आर्थिक वर्ष 2023 च्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीत कंपनीने 87 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो 81 टक्के इतका कमी आहे. वर्षापूर्वी याच अवधीत कंपनीने 422 कोटी रुपयांचा (आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱया तिमाहीत) नफा प्राप्त केला होता.









