मुंबई :
रसायन क्षेत्रातील कंपनी अनुपम रसायनचा समभाग बुधवारी चांगलाच तेजीत दिसून आला. कंपनीला ऑर्डर प्राप्त झाल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम समभागावर दिसला. बुधवारी कंपनीचा समभाग शेअरबाजारात 6 टक्के इतका वाढत 1150 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल मूल्य 12 हजार कोटी रुपयांवर पोहचले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जपानमधील कंपनीकडून अनुपमला 2200 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याचे सांगितले जाते.









