मुंबई
अदानी एंटरप्रायझेसचे समभाग बुधवारी शेअरबाजारात चांगलेच वधारताना दिसले आहेत. बुधवारी कंपनीचे समभाग 14.88 टक्के इतके वाढत बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1418 रुपयांवर आले होते. याआधीच्या सत्रात कंपनीचे समभाग 1364 रुपयांवर बंद झाले होते. ओडिसातील बॉक्साइट व्यवसायाची बोली मुंद्रा ऍल्युमिनीयम लिमिटेडकडे असणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. वर्षभरात समभाग 7 टक्के इतका तर 2023 मध्ये 60 टक्के इतका घसरलेला आहे.









