मुंबई
अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे समभाग बाजारात पुन्हा एकदा तेजीकडे मार्गक्रमण करत आहेत. मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग बीएसईवर 3 टक्के इतके वाढत इंट्रा डे दरम्यान 2720 रुपयांवर पोहचले होते. एनएसईवरही हा समभाग 3 टक्के इतका वधारला होता. समूहाच्या प्रवर्तकांनी अदानी एंटरप्रायझेसमधील आपला वाटा 67.55 वरुन 69,.87 टक्केपर्यंत वाढवला आहे. त्याचा परिणाम समभागावर सकारात्मक पाहायला मिळाला.









