वृत्तसंस्था/ मुंबई
फुड डिलीव्हरी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या स्विगी यांचा आयपीओ लवकरच शेअरबाजारामध्ये सादर केला जाणार असून त्याबाबत गुंतवणूकादरांमध्ये कमालिचा उत्साह संचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्विगीच्या आयपीओला त्यांच्या समभागधारकांनी मंजुरी दिली आहे.
समभागधारकांच्या मंजुरीनंतर स्विगीला आता आयपीओच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये उभारणे शक्य होणार आहे. याआधी 3 हजार 750 कोटी रुपये उभारण्याची योजना ठरविली गेली होती. गेल्या महिन्यातच आयपीओमधून अतिरीक्त वाढीव रक्कम उभारण्याबाबत वाच्यता बेंगळूरमधील कंपनीकडून करण्यात आली होती.
महसुलात चांगली कामगिरी
आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या महसुलात 36 टक्के वाढ झालेली दिसून आली. 8265 कोटी रुपये जे 2023 च्या आर्थिक वर्षात मिळविले होते त्या तुलनेमध्ये आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11247 कोटी रुपये महसुलाच्या माध्यमातून स्विगी कंपनीने मिळविले आहेत.