मुंबई:
रेल विकास निगम लिमिटेडचा समभाग गेल्या चार दिवसांपासून शेअरबाजारात सतत तेजीत राहिला आहे. मंगळवारपर्यंतच्या सत्रात कंपनीचा समभाग एकंदर 40 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी कंपनीचा समभाग 114 रुपयांवर पोहचत 52 आठवड्यानंतर उच्चांकी पातळीवर कार्यरत झालेला पाहायला मिळाला. मंगळवारी एकाच दिवशी हा समभाग 19 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला.









