सेन्सेक्स 746 अंकांनी तेजीत : गुंतवणूकदारांना 2.50 लाख कोटींचा फायदा
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारातील मिळत्याजुळत्या संकेतासोबत भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्यादिवशी दमदार तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्स 746 अंकांनी, निफ्टी 221 अंकांनी वाढत बंद झाला. सरकारी बँकिंग समभाग व ऑटो आणि रियल्टी कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्याचा फायदा बाजाराला झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 746 अंकांनी वाढत 80604 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 221 अंकांनी वाढत 24585 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. भारतीय वस्तुंवर आयात शुल्काबाबतची अनिश्चितता असताना कंझ्युमर ड्युरेबल्ससंबंधीत समभागांमध्ये विक्रीचा कल होता. सेन्सेक्स सकाळी वाढीसोबत 79,885 वर खुला झाला.
बाजारात तीन महिन्यानंतर नीचांकी स्तरावरुन सध्याला तेजी दिसते आहे. जागतिक बाजारातली सकारात्मकता आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारात परतणे यांची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. अमेरिका आणि रशिया यांच्या होणाऱ्या बैठकीकडे गुंतवणूकदार सकारात्मकपणे पाहात आहेत. याने भूराजकीय तणावात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सेन्सेक्समध्ये पाहता टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक 3.24 टक्के वाढत बंद झाले. तर इटर्नल, ट्रेंट, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, अदानी पोर्टस्, रिलायन्स इंडस्ट्रिज, अॅक्सिस बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, सनफार्मा, एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत होते. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र घसरणीत होते. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 0.85 टक्के वाढत बंद झाला तर स्मॉलकॅप 0.36 टक्के वाढीसह बंद झाला.
विविध निर्देशांकाचा विचार करता कंझ्युमर ड्युरेबल्स 0.72 टक्के इतका घसरत बंद झाला तर इतर सर्व निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. निफ्टी पीएसयु बँक निर्देशांक ठळक कामगिरी करत 2.20 टक्के वाढला होता. यानंतर रियल्टी 1.86 टक्के आणि ऑटो निर्देशांक 1.06 टक्के वाढत बंद झाला. आशियाई बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग 0.02 टक्के घसरत तर दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.04 टक्के वाढत बंद झाला होता. जपानचे बाजार सोमवारी बंद होते. अमेरिकेतील नॅसडॅक कंपोझीट मागच्या आठवड्यात सर्वोच्च स्तरावर बंद झाला. डोव्ह जोन्स शुक्रवारी 0.47 टक्के आणि एस अँड पी-500 0.78 टक्के वाढत बंद झाला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 2283
- टाटा मोटर्स 653
- इटर्नल 309
- ग्रासिम 2758
- अपोलो 7259
- ट्रेंट 5443
- एसबीआय 823
- जियो फायनॅन्शीयल 327
- अल्ट्राटेक सिमेंट 12405
- लार्सन टुब्रो 3668
- अॅक्सिस बँक 1073
- रिलायन्स 1386
- सनफार्मा 1608
- महिंद्रा-महिंद्रा 3186
- श्रीराम फायनान्स 617
- सिप्ला 1504
- कोटक महिंद्रा 1975
- एचडीएफसी बँक 1995
- अदानी पोर्टस् 1339
- विप्रो 241
- एसबीआय लाइफ 1851
- एचसीएल टेक 1488
- एचयुएल 2518
- नेस्ले 1105
- कोल इंडिया 382
- डॉ. रे•िज लॅब्ज 1219
- बजाज ऑटो 8275
- आयटीसी 416
- एशियन पेंटस् 2489
- एनटीपीसी 336
- एचडीएफसी लाइफ 764
- इन्फोसिस 1428
- टायटन 3467
- बजाज फिनसर्व्ह 1922
- आयशर मोटर्स 5671
- ओएनजीसी 233
- टीसीएस 3040
- इंडसइंड बँक 783
समभाग घसरलेल्या कंपन्या
- हिरो मोटोकॉर्प 4562
- भारत इले. 383
- भारती एअरटेल 1857









