वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकुर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणे निश्चित झाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानच्या जागी त्याला लखनौ संघात स्थान देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महालिलावात शार्दुल ठाकुर अनसोल्ड राहिला होता. तो सध्या एलएसजी संघात सामील विशाखापट्टणम येथे सामील झाला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील या संघाची सलामीची लढत सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेवेळी मोहसिनच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याआधी त्याला 2022 च्या आयपीएलमध्येही कारकिर्दीला धोका निर्माण करणारी दुखापत झाली होती. पण त्यातून तो सावरला होता आणि गेल्या मोसमात त्याने आयपीएलमध्ये भागही घेतला होता. लखनौमध्ये एलएसजीचे सराव शिबिर सुरू झाल्यापासून शार्दुल ठाकुर व शिवम मावी दोघेही ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले आहेत. मोहसिनशिवाय मयंक यादव, अवेश खान व आकाश दीप हे तीन वेगवान गोलंदाजही जखमी असल्याने बीसीसीआयच्या बेंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे उपचार व पुनर्वसन प्रक्रियेत भाग घेतला आहे.









