Shardiya Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केल आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सोबतच ‘आभा हेल्थ कार्ड’ ही नवीन संकल्पना सूरू करण्यात आल्याचीही माहिती दिली.
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत विशेष अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच तिच्या आरोग्याबाबत समाजात संवेदनशिलता निर्माण व्हावी या उद्देशाने हे अभियान सुरु करण्य़ात आले आहे. या अभियानात महिलांनी सहभाग नोंदवावा तसेच आपल्या आरोग्याविषयी जागृत राहावं अस आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरुवात झाली. ‘आभा हेल्थ कार्ड’ हा आयुष्यमान भारत हा डिजिटल मिशनचा भाग आहे. या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रूग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपल्बध होणार आहे. या हेल्थ कार्डमध्ये प्रत्येकाला आधारकार्डप्रमाणे १४ अंकी नंबर मिळणार आहे. यात रूग्णाच्या आरोग्यासंदर्भात संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. याच्या मदतीने डाॅक्टरांनी तुमच्या आरोग्याच्या नोंदी पाहता येणार आहेत. प्रत्येक रूग्णांची वैद्यकीय इतिहास शोधता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन केले.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









