वृत्तसंस्था/ म्हाप्सा (गोवा)
आगामी होणाऱ्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या पात्र फेरीच्या स्पर्धेत देशातील अचंता शरथ कमल आणि जी. साथीयान यांच्यासह 35 भारतीय टेबल टेनिसपटू एकेरीच्या पात्रतेसाठी सज्ज झाले आहेत.
येथील पेडम इनडोअर स्टेडियममध्ये 23 ते 28 जानेवारी दरम्यान दुसरी विश्व टेबल टेनिस स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये मनिका बात्रा, हरमित देसाई यांना प्रमुख ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अन्य 9 भारतीय टेबल टेनिसपटू प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळणार आहे. पात्र फेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत विविध वयोगटातील 32 भारतीय टेबल टेनिसपटू सहभागी होत आहेत. शरथ कमल आणि जी. साथीयान हे पात्र फेरी स्पर्धेतील प्रमुख आकर्षण राहतील.









