प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीमागे शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून अधिक काळ गंभीरपणे उभे आहेत. अलिकडेच दोन्ही राज्यात निर्माण झालेली गोंधळजन्य परिस्थिती त्यांच्या एका वाक्याने निवाळली इतके सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये आहे, असे मत मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त समिती आणि ट्रक बॉडी बिल्डर यांच्यावतीने हरिकाका कंपाऊंड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर युवा नेते आर. एम. चौगुले, रमेश मोतगेकर, मनोज पावशे, शिवाजी मंडोळकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, शिवाजी शिंदे, मनोहर संताजी, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रामचंद्र मोतगेकर होते. त्यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर सर्वांनीच शुभेच्छापर भाषणे केली. सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले. किरण मोदगेकर यांनी आभार मानले.









