Sharad Pawar News : शरद पवारांच्या घोषणेमुळे आम्ही आवाक झालो.निवृत्तीची घोषणा करतील अशी अपेक्षा नव्हती. देश, राज्य आणि पक्षाला पवारांची गरज आहे. शरद पवार यांनी या पदावरून बाजूला होऊ नये अशी सर्वांचीच तीव्र भावना आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतला.नविन अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी नेमलेल्या समितीची आज बैठक पार पडली. या बैठकित एक ठराव सर्वानुमते पारित केला ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार राहावेत यासाठी एकमताने राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षाध्यपदी कायम रहावे अशी विनंती एकमताने करणार आहोत. या बैठकिनंतर शरद पवार यांची आम्ही भेट घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवड समितिने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला . आज सर्वांच्या घरी दिवाळी साजरी करणार अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








