Maharashtra- karnatak disput : सीमावादाला कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून वेगळ रूप देण्याचा प्रयत्न होत असून केंद्राला बघ्याची भुमिका घेऊन चालणार नाही. तसेच येत्या ४८ तासाच हा प्रकार थांबला नाही तर मी बेळगावला जाणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी केले. त्यानी आज पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ” सीमावादाला कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून वेगळ रूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांची वक्तव्ये ही देशाच्या अखंडततेला घातक आहेत. त्यांनीच याची सुरवात केली आहे. येणाऱ्या कर्नाटक निवडणुकाच्या तोंडावर अशी वक्तव्ये केली जात आहेत का ? अशी शंका उपस्थित होत आहे.”
तसेच येत्या २४ तासात हा प्रकार थांबला नाही, तर आमचा ही संयम सुटेल असा ईशारा देताना, ते म्हणाले, “४८ तासाच हा प्रकार थांबला नाही तर बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी मी बेळगावला जाणार आहे. महाराष्ट्राने संयम पाळला पण त्यालाही काही मर्यादा आहेत. कुणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबरी केंद्र सरकारची आहे. गुजरात, कर्नाटकच्या सीमेवर आताच घटना का घडत आहेत. कुणीतरी चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी याची सुरवात केली.” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








