केसरीचा आखाडा साताऱ्यात महाराष्ट्र यशस्वीरित्या पार पडला
सातारा : राजधानीत महाराष्ट्र केसरीचा आखाडा यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता हिंदकेसरीचा ५२ वा आखाडा २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या आखाड्यात देशभरातून सुमारे ८०० मल्ल सहभागी होणार आहेत. कोट्यवधी रुपयांची बक्षिसे मल्लांसाठी ठेवण्यात आली असून या स्पर्धेला ज्येष्ठ नेते शरद पवार हे आर्वजून येणार आहेत. त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून राजेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना निमंत्रण दिले आहे.
साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा आखाडा यशस्वीरित्या पार पडला होता. त्यानंतर हिंदकेसरीच्या स्पर्धेचा मानही साताऱ्याला मिळाला आहे. भारतीय शैली कुस्ती संघटनेच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने साताऱ्याच्या छ. शाहु क्रीडा संकुलात २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान हिंदकेसरी स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेला ४०० पुरुष मल्ल आणि २५० महिला मल्ल सहभागी होणार आहेत. या मल्लांसाठी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कुस्तीचा आखाडाही आर्किटेक्टकडून करण्यात येणार आहे. पंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहेत.
हिंदकेसरी स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमी, कुस्तीप्रेमी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित रहावे याकरिता बारामती येथे राजेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने दीपक पवार, चंद्रकांत सुळ, आबा सुळ, वैभव फडतरे, संदीप साळुंखे, माणिक पवार, राजेश्वर पवार, जीवन कापले, देवराज पवार, सुधीर पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी स्पर्धेला येणार असल्याचे सांगितले.








