Ajit Pawar : हिंडेनबर्ग कंपनीने एक अहवाल जारी केला होता. या अहवालातून हिंडेनबर्ग कंपनीने भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भुमिका मांडली आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्यावर बोलू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं विधान अजित पवारांनी केलं.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, “एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी केले होते. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता. आम्ही तर या कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








