Sharad Pawar News : कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा मी आदर करतो.पक्षाच्या भवितव्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. एक- दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ,दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलनाची वेळ येणार नाही, अशी कार्यंकर्त्यांची समजूत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढली.आज सकाळपासून मुंबईच्या वाय. बी. सेंटरबाहेर अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत.
यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले, मी निर्णय घेताना पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना विचारात घ्यायला हवं होत.मात्र अस केलं असतं तर तुम्ही माझ्या निर्णयाला संमती दिली नसती. म्हणूच परिस्थितीचा आणि पक्षाच्या भवितव्यांचा विचार करून निर्णय घेतलायं. पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा होता.यानंतर एक- दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ अशी समजूत घालत शरद पवारांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








