Sharad Pawar : अजित पवारही पक्षाचं काम करतात.राष्ट्रवादीमध्ये सगळ काही अलबेल आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत.अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावली नाही. सर्वजण एकत्रित मिळून पक्षाला मजबूत करण्याचं काम करताहेत. सध्या होत असलेल्या चर्चा या माध्यमांच्या मनातील आहेत. राष्ट्रवाादीच्या कोणत्याही नेत्याच्या मनात या चर्चा नाहीत. असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, नव्या राजकीय चर्चा आम्हाला माहित नाहीत. अजित पवार यांच्याबाबतच्या चर्चा केवळ तुमच्या मनात, आमच्या मनात नाहीत. मुंबईत आमदारांची कोणतीही बैठक नाही.प्रदेशाध्यक्ष निवडणूकीमध्ये व्यस्त आहेत.याबाबत मी आता स्पष्ट सांगितले आहे तुम्हाला फाटे फोडायची गरज नाही अस म्हणत चुकीचे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धारेवर धरले.
नेमके काय घडलयं
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले आहे. आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.सोमवारी अजित पवार यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त होते. या संदर्भात शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.
Previous Article40 पेक्षा जास्त आमदार अजितदादांसोबत जाऊ शकतात
Next Article सतेज पाटील हे नैतिकता नसणारे नेते :धनंजय महाडिक








