राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाने राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्ष घटनेनुसार झाल्याच नसल्याचा युक्तिवाद केला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष घर चालवतो त्या पद्धतीने चालवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काल झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांचे विधिमंडळातील राष्ट्रवादीचे बहूतेक सर्व सदस्य अजित पवार यांच्या बाजूला आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे बहूमत आहे. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादीच्या दिड लाखाहून अधिक कार्यकर्त्यांनी आपली प्रतिज्ञापत्रे जमा केली असून त्यांनी अजित पवार यांना आपला नेता मानले आहे. पक्षाची बहूतेक सर्व बाजू हि अजित पवार यांच्या बाजूला झुकली असल्य़ाने पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर अजित पवार यांचाच हक्क आहे.
याच बरोबरच मनिंदर सिंग यांनी यांनी मोठा युक्तीवाद करताना शरद पवार यांची पक्षाने केलेली नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचे सांगून आव्हाना दिले. ते म्हणाले,”2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात शरद पवार यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पण हि नियुक्ती बेकायदेशीर असून हि निवड करताना लोकशाहीची तत्वे पाळली गेली नाहीत. पक्षाच्या अध्यक्षपदावर ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली त्या व्यक्तीने पक्षाची घटना आणि पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उल्लंघन करत इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. तसेच पदाधिकारी निवडताना लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली.” असा दावाही अजित पवार गटाच्या वकिलांनी केला.









