Sharad Pawar News : ओबासी- मराठा समाजात वाद निर्माण करू नका. ओबासी कोट्यातून आरक्षण देणं मला योग्य वाटत नाही. 50 टक्क्यांची मर्यादा सरकारन वाढवून द्यावी. तसं केल्यास आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटतील. मर्यादा 15 ते 16 टक्क्यांनी वाढवल्यास सर्व प्रश्न सुटतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आंदोलन, जालना लाठीचार्ज, जळगाव दुष्काळ या पातळीवर आज त्यांनी चर्चा केली. तसेच कार्यक्रम घेवून काही होत नाही मुळ समस्यांकडे सरकारने लक्ष द्यायला हव असा टोला लगावला. विशेष अधिवेशन बोलवा, आरक्षणाचा ठराव मान्य करा.ओबीसी कोटा वाढवून मराठी समाजाला आरक्षण द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, एक देश, एक निवडणुकीचा मुद्दा लक्ष विचलित करण्यासाठी आहे.विशेष अधिवेशन बोलवण्याची काहीच गरज नव्हती. शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही.पिण्याची पाण्याची समस्या गंभीर आहे. जी-20 निमंत्रणावर प्रसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कोणाला नाही. लाठीमाराचे आदेश कोणी दिले हे सरकारला सांगावे असेही ते म्हणाले.








