Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांनी अगामी निवडणुकांसाठी महत्वाचे विधान केले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) आगामी विधानसभा 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे.
“महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अंतिम निर्णय होणे बाकी आहे. महाविकास आघाडीतील (MVA) घटकपक्षांनी आतापर्यंत अनेक मुद्द्यांवर एकत्रित निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी युतीचे निर्णय घेण्यात मला फारशी अडचण दिसत नाही.” असे शरद पवारांनी म्हटले आहे. इतर काही पक्षदेखील या आघाडीत सामील होण्यास इच्छुक असून त्यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेसाठी अनुक्रमे ‘मिशन 45’ आणि ‘मिशन 145’ सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते म्हणुन शरद पवार यांच्या विधानाला महत्त्व आले आहे. या मिशननुसार, भाजप महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 45 आणि विधानसभेच्या 288 जागांपैकी 145 जागा जिंकण्यासाठी तयारीला लागला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








