Sharad Pawar : भाजपने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. अच्छे दिन लोकांना पाहायला मिळालेच नाहीत. ठाणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लवकरच काही जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ठाण्यातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
शरद पवार यांचं लक्ष आता लक्ष ठाण्यावर आहे. आज झालेल्या बैठकिनंतर त्यांनी ठाण्यावर विशेष लक्ष द्यायला पाहिजे अस म्हटलं आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार सुरुंग लावणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आज त्यांनी भाजपने लोकांनी दिलेली आश्वासनं पाळली नाही अस म्हणतं टिका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, देशातील सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ई-प्रणाली सुरु करण्याचे भाजपने निवडणूकीच्यावेळी आश्वासनं दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळले नाही. २०१८ मध्ये दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा देण्याचं आश्वासन दिल होतं. ते आज ही अपूर्ण आहे. देशातील ३० टक्के घरात अजूनही शौचालय नाही. महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. बिल्किस बानो प्रकरणी तिन्ही कार्टाने शिक्षा सुनावली. पण गुजरात सरकारनं आरोपींना सोडलं त्यांचा सत्कार केला गेला ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








